6 मे रोजी पाचव्या टप्प्याचं मतदान झालं. यात 7 राज्यातल्या 51 जागांचा समावेश होता. या पाचव्या टप्प्यात एकूण 28 टक्के उमेदवार करोडपती होते तर त्यांची सरासरी संपत्ती होती 2.57 कोटी. आत्तापर्यंत झालेल्या सर्व टप्प्यांमध्ये या पाचव्या टप्प्यांमधल्या उमेदवारांची संपत्ती सर्वात कमी आहे तर पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांची संपत्ती सर्वात जास्त होती.