संरक्षण बजेटवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या टॉप-10 देशांची यादी, भारत आहे या स्थानावर
अमेरिका संरक्षणावर सर्वात जास्त खर्च करणारा जगातला देश आहे. चीन दुसऱ्या तर, भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर ब्रिटन चौथ्या आणि रशिया पाचव्या स्थानावर आहे. 2021 मध्ये जगभरातील लष्करी खर्च $2,113 अब्जांवर पोहोचला आहे. सिपरी (SIPRI) या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संस्थेने ही माहिती दिली. SIPRI ही संघर्ष, शस्त्रास्त्र, नि:शस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रण यावर संशोधन संस्था आहे. हा अहवाल अशा वेळी आला आहे, जेव्हा जग दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणामांना सामोरे जात आहे.
अमेरिका हा देश आपल्या सैन्यावर सर्वाधिक खर्च करतो. सुमारे 801 अब्ज डॉलर्स. जर आपण चीन आणि भारताचा लष्करी खर्च वगळला तर, जगातील पहिल्या दहा देशांमध्ये समावेश होणाऱ्या इतर सर्व देशांचे लष्करी खर्च मिळून होणारा एकूण लष्करी खर्च त्यांच्या निम्मा आहे.
2/ 10
अमेरिकेनंतर चीन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लष्करी खर्च करणारा देश आहे. तो जगातील एकूण लष्करी खर्चापैकी सुमारे 14 टक्के खर्च लष्करावर करतो. हा खर्च अंदाजे 292 अब्ज डॉलर्स इतका आहे.
3/ 10
या क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा खर्च गेल्या वर्षी 76.6 अब्ज डॉलर्स होता, जो 2020 च्या तुलनेत 0.9 टक्के आणि 2012 च्या तुलनेत 33 टक्क्यांनी वाढला आहे.
4/ 10
पहिल्या दहा देशांच्या यादीत ब्रिटन चौथ्या क्रमांकावर आहे. ब्रिटनचा लष्करी खर्च 68.4 अब्ज डॉलर्स इतका आहे.
5/ 10
युक्रेनवर हल्ला करून प्रसिद्धीच्या झोतात आलेला रशिया पाचव्या स्थानावर असून त्यांचा लष्करी खर्च 65.9 अब्ज डॉलर्स असल्याचं सांगण्यात येत आहे.
6/ 10
लष्करी खर्चाच्या बाबतीत फ्रान्स जगात सहाव्या क्रमांकावर आहे. तो त्यांच्या सैन्यावर 56.6 अब्ज डॉलर्स खर्च करतो.
7/ 10
सातव्या क्रमांकावर असलेला जर्मनीला आपल्या सैन्यावर 56 अब्ज डॉलर्स खर्च करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
8/ 10
सौदी अरेबिया आठव्या क्रमांकावर आहे. त्यांचा लष्करी खर्च अंदाजे 55.6 अब्ज डॉलर्स इतका आहे.
9/ 10
जपान आपल्या सैन्यावर 54.1 अब्ज डॉलर्स खर्च करतो आणि सर्वाधिक लष्करी खर्च करणाऱ्या पहिल्या दहा देशांच्या यादीत नवव्या स्थानावर आहे.
10/ 10
दक्षिण कोरिया या टॉप 10 यादीत आपले स्थान बनवू शकतो आणि त्याने 50.2 अब्ज डॉलर्स खर्च करण्याचं घोषित केलं आहे.