

नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्यंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज कोविड-19 (Covid-19) वर असलेल्या मंत्रिगटाची (GoM) बैठक घेत आढावा घेतला. देशात दररोज रुग्णांची संख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. हाती आलेली आकडेवारी दिलासा देणारी आहे असंही त्यांनी सांगितलं.


देशात आत्तापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. देशासाठी ही दिलासा देणारी गोष्ट असल्याची माहितीही त्यांनी दिली.


देशाचा रिकव्हरी रेट हा 64.5 टक्के असून पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण हे 33.27 टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली.


भारतातला मृत्यू दर हा कमी असून तो सध्या 2.18 टक्के एवढा आहे. जगात हा दर सर्वात कमी असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं.


देशात 1.61 रुग्णांना ICU ची गरज आहे. तर 2.32 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता. ही संख्या आटोक्यात राहावी असा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.