2021 चा अखेरचा सूर्यास्त, विविध शहरांत दिसला असा नजारा; पाहा PHOTOs
भारतात आणि जगभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये या वर्षीच्या अखेरच्या सूर्यास्तासाठी मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी संमीश्र आठवणींनी भरलेल्या या वर्षाला सूर्याच्या साथीने अखेरचा निरोप दिला.
|
1/ 7
दिल्लीच्या विजय चौकात या वर्षीच्या सूर्यास्ताची टिपलेली ही काही क्षणचित्रं. कोरोनाचा उद्रेक आणि उतरण अशा दोन्ही गोष्टी या वर्षात पाहिल्यानंतर अखेरचा सूर्यास्त पुढच्या वर्षासाठी आशा आणि चिंता यांचं मिश्रण देऊन गेला.
2/ 7
मुंबईतील जुहू चौपाटीवर अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आल्हाददायक थंडी आणि सुखद वाऱ्याच्या झुळुका अंगावर घेत मुंबईकरांनी 2021 च्या अखेरच्या सूर्याला अलविदा केला.
3/ 7
चेन्नईत सूर्यास्त झाला, पण दिसलाच नाही. पावसानं चेन्नईत वर्षाच्या शेवटच्या दिवशीही हजेरी लावली होती.
4/ 7
देवभूमी मानल्या जाणाऱ्या केरळमध्ये तर सूर्यास्ताचा नजारा पाहण्यासारखा होता. शांत आणि भव्य समुद्रात विलीन होत सूर्याने 2021 ला अलविदा केला.
5/ 7
तर ओडिशातील पुरीमध्ये मंदिराच्या कळसामागून सूर्याने सर्वांना अलविदा केला तो थेट पुढच्या वर्षी भेटण्यासाठीच…
6/ 7
सूर्यास्त झाला आणि भारतासह जगभरात सेलिब्रेशनला सुरुवात झाली.
7/ 7
सूर्यास्तानंतर मुंबईचं रुपडंच बदललं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत काहीशी अशी दिसत होती.