

गुजरातमधील बहुचर्चित महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि एएसआय संशयास्पद मृत्यू प्रकरणानं नवीन वळण घेतलं आहे. फॉरेन्सिक रिपोर्टद्वारे धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, पोलीस कॉन्स्टेबल खुशबूनं आधी ASI रविराज जडेजा यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर स्वतःदेखील आत्महत्या केली.


या दोघांचेही मृतदेह गुरुवारी (11 जुलै) एक खोलीत आढळून आले. राजकोट शहरातील युनिर्व्हसिटी पोलीस ठाण्यात दोघंही कार्यरत होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशबू कानाबार आधी रविराज यांची हत्या केली आणि त्यानंतर रवीच्या कुशीत बसून स्वतःवरदेखील गोळी झाडून आत्महत्या केली.


या धक्कादायक खुलासा होण्यापूर्वी पोलिसांनी असं वाटत होतं की, रविनं खुशबूची हत्या करून नंतर आत्महत्या केली असावी. पण तपासादरम्यान याविरोधीच परिस्थिती समोर आली.


खुशबूला रवीसोबत लग्न करून संसार थाटण्याची इच्छा होती. पण खुशबूसोबत विवाह करणं रवीला शक्य नव्हतं कारण त्याला मुलंदेखील होती.


तपासदरम्यान खुशबूच्या हातावर गन पावडर आढळून आल्यानं तिनंच गोळीबार केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.