

जगात असे खूप कमी जण आहेत, जे आपल्या आयुष्याचा आदर्श ठेवून जातात. हरियाणात स्त्रीवर अत्याचार होतात असं म्हटलं जातं, पण याच राज्यातली एक मुलगी जगासाठी आदर्स बनली होती. ती आहे कल्पना चावला.


नेहमी घुंगटाच्या आड राहणाऱ्या हरियाणातल्या मुली कल्पना चावलाचा आदर्श घेतायत. मोकळ्या आकाशात करियरची भरारी मारायची तयारी करतात.


अंतराळात गेलेली पहिली भारतीय महिला कल्पना चावलाची आज 56वी जयंती आहे. कल्पनाचा जन्म 17 मार्च 1962चा. हरियाणाच्या करनालमध्ये तिचा जन्म झाला. बनारसी लाल चावला आणि आई संज्योतीची ही मुलगी. भावंडात सर्वात लहान असलेल्या कल्पनाचं शिक्षण टागोर बाल निकेतनमध्ये झालं होतं. शाळेत असतानाच तिला इंजिनियर बनायचं होतं. आपल्याला अंतराळात जायचंय, हे तिनं अनेकदा वडिलांना सांगितलं होतं.


कल्पनानं 1982मध्ये चंदीगढ इंजिनियरिंग काॅलेजमध्ये शिक्षण घेतलं. पुढच्या शिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली. 1983मध्ये कल्पनाची ओळख फ्लाइंग इंस्ट्रक्टर जीन-पियर हॅरिसनशी ओळख झाली. पुढे दोघांनी लग्नही केलं. 1984मध्ये तिनं एयरोस्पेस इंजीनियरिंगमध्ये पदवी घेतली. यानंतर कल्पनाचं स्वप्न पूर्ण व्हायची वेळ जवळ आली. 1995मध्ये नासामध्ये ती अंतराळ प्रवासी बनायला तयार झाली.


कल्पना नेहमी म्हणायची, मी अंतराळासाठीच बनलीय. कल्पनानं पहिलं उड्डाण 1998मध्ये केलं. तिनं अंतराळात 327 तास होती. पृथ्वीची 252वेळा परिक्रमा पूर्ण केली. या यशस्वी मिशननंतर कल्पना चावला दुसऱ्या उड्डाणासाठी सज्ज झाली. तिच्या सोबत 7 जण होते. हे मिशन सारखं पुढे ढकललं गेलं. 2003मध्ये ते लाँच झालं. 16 दिवसांचं उड्डाण होतं.


1 फेब्रुवारी 2003मध्ये शटल पृथ्वीवर परतत होतं. कॅनडी स्पेस सेंटरवर उतरणार होतं. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. कल्पना पृथ्वीपासून 16 मिनिटाच्या अंतरावर होती. सगळे वाट पहात होते. यानानं पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आणि तापमानामुळे स्फोट झाला. यानातले सगळे अंतराळ वीरांचा मृत्यू झाला.