मोसमातील पहिली बर्फवृष्टी; उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात बर्फाची चादर
सोमवारी उत्तर भागातील डोंगराळ भागात हिमवृष्टी झाली. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.
|
1/ 7
अनेक भागात सोमवारी झालेल्या बर्फवृष्टीनंतर उत्तर भारतात थंडी वाढली आहे.
2/ 7
केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हरसिलसह सर्व उंचावरील भागात रविवारी रात्रीपासूनच बर्फवृष्टी सुरू झाली. सोमवारी सकाळपर्यंत बर्फाची मोठी चादर पसरली होती.
3/ 7
उत्तराखंडच्या उंच हिमालयीन भागात, या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली, त्यानंतर राज्यात थंडी वाढली आहे.
4/ 7
जवाहर टनलजवळ बर्फवृष्टी आणि अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्ग सोमवारी बंद करण्यात आला.
5/ 7
हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीतिमध्ये बर्फवृष्टी...
6/ 7
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातही सोमवारी बर्फवृष्टी झाली.
7/ 7
उत्तराखंडच्या देहराडून, मसूरी तसंच इतर भागात रात्रभर पाऊस झाला. त्यामुळे थंडी वाढली आहे. पुढील एक-दोन दिवस बर्फवृष्टी सुरूच राहणार असल्याची शक्यता हवामन विभागाने वर्तवली आहे.