भारत विविध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशासाठी ओळखला जातो. हा विश्वासाचा देश आहे, जिथे लाखो मंदिरे आणि इतर प्रार्थनास्थळे आहेत. इथे पूजेची पद्धतही वेगळी आहे. काही झाडे आणि वनस्पतींची पूजा करतात तर काही प्राण्यांवर श्रद्धा ठेवतात. यूपीच्या झाशीमध्ये असे एक मंदिर आहे, ज्यामध्ये कुत्रीची मूर्ती बसवण्यात आली आहे.
येथील लोक सांगतात की या दोन्ही गावात एक कुत्री राहायची, जी कोणत्याही प्रसंगात जेवणासाठी पोहोचायची. एकदा रेवण गावात जेवणाचा कार्यक्रम होता. रामतुलाचा आवाज ऐकून ती कुत्री अन्न खाण्यासाठी रेवण गावात पोहोचली. पण, जेवण तिथेच संपले होते. यानंतर ती काकवाडा गावात पोहोचली, तिथेही अन्न उपलब्ध नव्हते आणि त्यामुळे तिचा उपासमारीने मृत्यू झाला.
या परिसरात राहणारे इतिहास तज्ज्ञ हरगोविंद कुशवाह सांगतात की, दोन्ही गावातील लोकांना या कुत्रीच्या मृत्यूने खूप दु:ख झाले, त्यानंतर त्यांनी दोन्ही गावांच्या सीमेवर कुत्रीला पुरले आणि काही काळानंतर तेथे मंदिर बांधले. आता परंपरा अशी आहे की, आजूबाजूच्या गावात कोणताही कार्यक्रम झाला तर लोक या मंदिरात जाऊन अन्नदान करतात.