Jagannath Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरी रथ यात्रेला सुरुवात; कोरोनानंतर 2 वर्षांनी जमली भाविकांची एवढी गर्दी
Jagannath Rath Yatra 2022: ओडिशातील पुरी या पवित्र शहरात भगवान जगन्नाथाची प्रसिद्ध रथयात्रा आज काढण्यात येत आहे. पुरीत जगभरातून मोठ्या संख्येने लोक जमले आहेत. कोरोनामुळे काहीशी काळजी घेतली जात आहे, अन्यथा ऐरव्ही लाखो लोक 'आषाढी बीज' च्या दिवशी जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी आणि रथयात्रेच्या मार्गावर मिरवणुकीसाठी जमतात, सजवलेल्या हत्ती घोड्यांची मिरवणूक निघते.
|
1/ 5
भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. आज भगवान जगन्नाथ आपली बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्यासह रथातून गुंडीचा मंदिराकडे प्रस्थान करतात.
2/ 5
ही यात्रा 01 जुलै ते 12 जुलै पर्यंत चालणार आहे. या यात्रेनिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
3/ 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून रथयात्रेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, रथयात्रेच्या विशेष दिवसाच्या शुभेच्छा. आम्ही भगवान जगन्नाथांना कायम आशीर्वादासाठी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना चांगले आरोग्य आणि आनंद मिळो.
4/ 5
ओडिशातील पुरी येथे आजपासून सुरू होणाऱ्या रथयात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर या वेळी महोत्सवात लोकांचा अधिकाधिक सहभाग अपेक्षित आहे.
5/ 5
भगवान जगन्नाथाच्या 145 व्या रथयात्रेला राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील सर्व मार्गांवर जवळपास 25,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.