ओनिबाचे वकील शकील कुरेशी यांनी याबाबत एनसीबीकडे धाव घेतली होती. शकील यांनी त्यांचे नातेवाईक तबसुम रियाज कुरेशी आणि तिचा साथीदार निझाम कारा यांच्यामुळे ते यात अडकल्याचा दाट संशय व्यक्त केला होता. तबसुमने त्यांना लग्नाची भेट म्हणून कतारचे हनिमून पॅकेज दिले. सोबत कतारच्या नातेवाईकांकडे देण्यासाठी एक पार्सल सोबत दिल्याचेही शकील यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले.
कुरेशी यांच्या तक्रारीनंतर एनसीबीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. 22 डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात निझाम कारा आणि तबसुमला 13 ग्रॅम कोकेनसह अटक केली. एमसीबीने दुसरीकडे ड्रग्ज रॅकेट प्रकरणात कित्येक किलो चरस तस्करीत वेद राम, महेश्वर, शाहनवाज गुलाम चोराटवाज आणि शबानाला हे ड्रग्ज दिल्याचे समोर आले.
7 सप्टेंबर रोजी निझामला बेल मिळताच एनसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याच्यावर लक्ष ठेवले. अखेर 14 ऑक्टोबर रोजी निझाम कारा आणि शाहिदा त्यांच्या हातील लागले. त्यांच्या चौकशीत त्यांनीच तबसुम मार्फत कुरेशी दाम्पत्याला यात अडकवल्याची माहिती समोर आली आहे. आता कारागृहात जन्मलेली मुलगी 1 वर्षांची झाली आहे.