Photo: मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारविरुद्ध BJP,सुमित्रा महाजनांना घेतले ताब्यात
मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारविरुद्ध भाजप असे चित्र निर्माण झाले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीनंतर पोलिसांनी भाजपच्या एक हजार कार्यकर्त्यांसह पोलिसांनी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांना ताब्यात घेतले.
|
1/ 5
मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारविरुद्ध भाजप असे चित्र निर्माण झाले आहे.
2/ 5
मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या दौऱ्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून भाजप नेत्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
3/ 5
भाजपने कलम 144 चं उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
4/ 5
पोलिसांनी या भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन जिल्हा कारागृहात नेलं आहे. यात भाजपचे मध्य प्रदेश अध्यक्ष राकेश सिंग, सुमित्रा महाजन, इंदूरचे खासदार शंकर ललवानी, आमदार आणि इंदूरच्या महापौर मालिनी सिंग यांचाही समावेश आहे.
5/ 5
भाजप खासदार शंकर ललवानी, महापौर मालिनी सिंग आणि आमदार रमेश मेंदोला यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.