मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या बालाघाटमधील किरणापूर भागातील भुक्कूटोला इथं ही अपघाताची घटना घडली आहे. या दुर्घटनेत पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव पायलट मोहित तर महिला प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे नाव वरसुका असं आहे. घटना आज दुपारची असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातग्रस्त विमानात एक महिला पायलट सुद्धा होती. अपघातग्रस्त विमान हे महाराष्ट्रातील गोंदिया येथील बिरसी विमानतळावरून प्रशिक्षणार्थी विमान होतं. या विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये मध्यप्रदेशामधील बालाघाट जिल्ह्यात कोसळलं. हा अपघात नेमका कसा घडला याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.