आयर्न लेडी इंदिरा गांधी यांचे न पाहिलेले 18 दुर्मीळ PHOTOS
भारताच्या पहिल्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची आज 36 वी पुण्यतिथी आहे. देशातील सर्वात ताकदवान आणि प्रबळ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेत पाकिस्तानला धूळ चारली होती. 'ऑपरेशन ब्लू स्टार' संदर्भात त्यांना अनेक राजकीय अडचणींचा सामना करावा लागला.
|
1/ 19
इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. 31 ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांनी इंदिरा गांधी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती.
2/ 19
इंदिरा गांधी यांचे काही दुर्मीळ फोटो नेटवर्क18च्या संग्राहातून देत आहोत. स्वित्झर्लंडच्या झ्युरिचमधल्या एका भारतीय दुकानातला त्यांचा हा फोटो. (फोटो - AFP)
3/ 19
वडील जवाहरलाल नेहरू यांच्या समवेत एका दौऱ्यावर असतानाचा हा दुर्मीळ फोटो (फोटो- गेटी इमेजेस)
4/ 19
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू चीनच्या दौऱ्यावर होते, त्या वेळी इंदिराही त्यांच्या समवेत होत्या. झोऊ इन्लाई या चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यासमवेतचा हा एक क्षण(फोटो AFP)
5/ 19
पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी फ्रान्स पॅरिसच्या दौऱ्यावर असताना एका अनौपचारिक क्षणी (फोटो AFP)
6/ 19
१९५९च्या निवडणुकांनंतर इंदिरा गांधी आयर्न लेडी म्हणून उदयाला आल्या. काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. (फोटो AFP)
7/ 19
जवाहरलाल नेहरू आणि कन्या इंदिरा यांचा एका निवांत क्षणाचा हा फोटो तुम्ही कधी पाहिला नसेल. (फोटो AFP)
8/ 19
पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यासमवेत सिमला कराराच्या वेळी इंदिरा गांधी. (फोटो AFP)
9/ 19
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी इंदिरा गांधी यांच्या स्वागताला औपचारिक भोजन समारंभ आयोजित केला होता. (फोटो AFP)
10/ 19
इंदिरा गांधी कॅथलिक नन आणि समाजसेवक मदर तेरेसांबरोबर (फोटो : AFP)
11/ 19
लागोपाठच्या निवडणुका जिंकून 'गुंगी गुडिया' ते 'आयर्न लेडी' अशी आपली प्रतिमा बळकट करणाऱ्या इंदिरा गांधी (फोटो AFP)
12/ 19
1971 मध्ये पंतप्रधानपदी इंदिरा गांधी या दुसऱ्यांदा निवडून आल्या. (फोटो AFP)
13/ 19
रणरागिणीच्या आवेशात दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममधला हा दुर्मीळ फोटो (फोटो AFP)
14/ 19
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूसमयी इंदिरा (फोटो AFP)
15/ 19
पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर लगेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरारजी देसाई यांच्याशी हस्तांदोलन करताना (फोटो AFP)
16/ 19
भारताच्या पंतप्रधान म्हणून फ्रान्सच्या औपचारिक दौऱ्यावर असताना पॅरिसमध्ये टिपलेली आयर्न लेडीची ही छबी (फोटो AFP)
17/ 19
राजीव गांधी आणि काँग्रेस नेते पी. व्ही नरसिंह राव यांच्या समवेत काँग्रेसच्या एका अधिवेशनाच्या वेळी इंदिरा गांधी (फोटो AFP)
18/ 19
कॅनडाचे माजी पंतप्रधान पिअर ट्रुडो यांच्या समवेत एका दौऱ्याच्या वेळचा हलका फुलका क्षण (फोटो AFP)
19/ 19
सिमल्याच्या गव्हर्नर मेन्शनमध्ये ऐतिहासिक करारावर सही केल्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्याशी हातमिळवणी करताना (फोटो AFP)