लवकरच सुरू होतंय भारतातील पहिलं AC रेल्वे स्टेशन, पाहा गारेगार टर्मिनलचे PHOTOs
भारतातील पहिलं वातानुकुलीत रेल्वे स्टेशनचं बंगळुरूमध्ये लवकरच उद्घाटन होणार आहे. सहा महिन्यांपूर्वीच या रेल्वे स्टेशनचं बांधकाम पूर्ण झालं आहे. रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव हे 1 सप्टेंबरला याचं उद्घाटन करणार आहेत.
भारतातील पहिलं वातानुकुलीत रेल्वे स्टेशनचं बंगळुरूमध्ये लवकरच उद्घाटन होणार आहे. सहा महिन्यांपूर्वीच या रेल्वे स्टेशनचं बांधकाम पूर्ण झालं आहे. रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव हे 1 सप्टेंबरला याचं उद्घाटन करणार आहेत.
2/ 8
बंगळुरूतील बय्यप्पनहल्ली रेल्वे स्टेशन पूर्णतः तयार असून सप्टेंबरपासून ते कार्यान्वित होईल.
3/ 8
सर एम. विश्वेश्वरैय्या रेल्वे टर्मिनसचं काम सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झालं होतं. आता 1 सप्टेंबरला रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर ते सामान्यांसाठी खुलं होणार आहे.
4/ 8
रेल्वेकडून अधिकृतपणे याबाबतची घोषणा करण्यात आली नसली, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिनाअखेर सर्व औपचारिकता पूर्ण करून पुढच्या महिन्यात उद्घाटन होणार असल्याची माहिती ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सूत्रांनी दिली आहे.
5/ 8
मार्च 2021 मध्येच या रेल्वे टर्मिनसचं काम पूर्ण झालं होतं. मात्र पंतप्रधान 4 राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात व्यस्त असल्यामुळे त्यांच्याकडे उद्घाटनासाठी वेळच नव्हता. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आणि पावसाळी अधिवेशन आलं.
6/ 8
2015-16 साली या रेल्वे स्थानकाला मंजुरी देण्यात आली होती. बंगळुरूतून अधिकाधिक ट्रेन धावाव्यात, या उद्देशाने हे रेल्वे टर्मिनस सुरू करण्यात आलं आहे.
7/ 8
या रेल्वे टर्मिनलच्या ओव्हरब्रीजचं काम अपूर्ण असणं, हे देखील उद्घाटनाला विलंब होण्यामागचं एक कारण सांगितलं जात आहे.
8/ 8
जून 2020 मध्ये या पुलाचं बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र कोरोनाच्या उद्रेकामुळं हे काम लांबणीवर पडलं.