नव्या नवरीची अशी अनोखी बिदाई कधी पाहिली नसेल! कारण ऐकून तुम्हीही व्हाल भावुक
नव्या नवरीची पाठवणी अक्षरशः तळहातांवरून झालेली कधी पाहिली नसेल. ही अनोखी बिदाई तळहातांवर पावलं ठेवून झालेली कधी पाहिली आहे? ही बिदाई अनोखी आहे कारण त्याच्या मागची गोष्टच तशी भावुक करणारी आहे. भारतीय वायुदलाच्या अशोक चक्राने सन्मानित शहीद कमांडोच्या बहिणीच्या लग्नाची ही कहाणी...


नव्या नवरीची पाठवणी अक्षरशः तळहातांवरून झालेली कधी पाहिली नसेल. ही अनोखी बिदाई तळहातांवर पावलं ठेवून झालेली कधी पाहिली आहे? ही बिदाई अनोखी आहे कारण त्याच्या मागची गोष्टच तशी भावुक करणारी आहे. भारतीय वायुदलाच्या शहीद कमांडोच्या बहिणीच्या लग्नाची ही कहाणी...


काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करताना शहीद झालेले कमांडो ज्योतिप्रकाश निराला यांच्या बहिणीचं हे लग्न अनोखं ठरलं या शहीद जवानाच्या सैनिक दोस्तांनी दाखवलेल्या दिलदारपणामुळे. बिहारच्या रोहतासमध्ये राहणारे ज्योतिप्रकाश निराला भारतीय वायुसेनेत कमांडो होते. वायुदलाच्या गरुड पथकात ते कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी - 18 नोव्हेंबर 2017 रोजी जम्मू काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा सामना करत असताना ते शहीद झाले.


बिहारच्या रोहतासमध्ये राहणारे ज्योतिप्रकाश निराला भारतीय वायुसेनेत कमांडो होते. वायुदलाच्या गरुड पथकात ते कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी - 18 नोव्हेंबर 2017 रोजी जम्मू काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा सामना करत असताना ते शहीद झाले.


6 काश्मिरी अतिरेक्यांशी लढताना निराला यांनी प्राण पणाला लावत त्यांचा खात्मा केला. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आलं. ज्योतिप्रकाश तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. शशिकला या त्यांच्या बहिणीच्या लग्नाची बातमी समजली तेव्हा शहीद दोस्ताच्या घरात काही कमी पडू नये म्हणू वायुदलातले त्याचे 20 सहकारी जवान दाखल झाले.


तळहातावर जपलेल्या बहिणीला तिच्या भावाची कमतरता जाणवू नये म्हणून अक्षरशः या कमांडो दोस्तांनी तिच्या लग्नात तळहातावरून बिदाई केली.