

मॉरिशसमध्ये 7 ऑगस्ट रोजी पर्यावरणीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. मॉरिशसच्या समुद्रातील एका भागात तेलगळती झाल्यानंतर मदतीचं आवाहन केल्यानंतर भारत पुढे आला आहे. भारत सरकारने वायुसेना हेलिकॉप्टर IAF C-17 च्या माध्यमातून 30 टन टेक्निकल उपकरण आणि साहित्य पाठविलं आहे. तेलगळतीच्या संकटात मदत म्हणून भारत पुढे आला आहे.


तेलगळतीची समस्येशी लढण्यासाठी भारतीय तटरक्षक बलाच्या 10 सदस्यीय टीमला या संकटात तैनात केलं होतं. भारतीय वायुसेनाच्या विमानातून 10000 उच्च क्षमता असलेले तेल शोषून घेणारे पॅडही पाठविण्यात आले, ज्याला विशेष स्वरुपात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने खरेदी केलं आहे.


जगभरात कोरोनाचा कहर असताना समुद्रात झालेल्या 1000 टन तेलगळतीमुळे मॉरिशसचे जीवन विस्कळीत झाले आहे. येथील समुद्रात अडकलेले जपानी जहाज अखेर दोन भागात तुटले आहे. यामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात तेलगळतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


जपानी अधिकाऱ्यांनी शनिवार सांगितले की गेल्या महिन्यात जे मालवाहक जपानी जहाज 'एमवी वाकाशियो' (MV Wakashio) मॉरिशसमध्ये एका खडकाला धडक दिल्याने अडकले होते ते दोन भागांमध्ये तुटले असून त्याने दोन वेगळे (Japanese Ship Broken) भाग झाले आहेत. मॉरिशस नॅशनल क्राइसिस कमिटी (Mauritius National Crises Committe) ने सांगितले की शनिवारी जहाजची परिस्थिती खूप खराब झाली होती आणि दुपार होत असताना त्याचे दोन तुकडे झाले. कमिटीने हे देखील सांगितले की जहाजाच्या पुढील भाग सायंकाळी 4.30 वाजता वेगळा झाला होता. विशेष तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आता याला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.