

1. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा भाऊ अम्मारचा एक ऑडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने कबुली दिली आहे की, भारतीय वायुदलाकडून त्यांच्या तळांवर हल्ला करण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाने जैश दहशतवाद्यांना ट्रेनिंग देत असलेल्या ठिकाणांवर बॉम्ब फेकल्याचं त्याने त्या व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.


2. फर्स्टपोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, इटलीच्या पत्रकार फ्रेंचेस्का मॅरिनो यांनी दावा केली आहे की, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला ज्यात अनेक दहशतवादी मारले गेले. फ्रेंचेस्का मॅरिनो यांनी एअर स्ट्राईक झालेल्या ठिकाणी स्थानिकांशी चर्चा केली आहे. यात समोर आलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राईक झाल्यानंतर रुग्णवाहिकेतून 35 मृतदेह घेऊन जाण्यात आले होते. घटना घडताच काही स्थानिक घटनास्थळी गेले पण पाक लष्कराकडून त्यांचे मोबाईल घेण्यात आले अशीही माहिती समोर आली आहे.


3. भारताने केलेलं एअर स्ट्राईक हे यशस्वी झालं असल्याचं भारतीय वायुदलाचे प्रमुख बी.एस. धनोआ यांनी स्पष्ट केलं. जर आम्ही आमचं टार्गेट हिट केलं नसतं तर त्यांनी प्रतीहल्ला केलाच नसता असंही धनोआ म्हणाले.


4. एअर स्ट्राईक झाल्यानंतर सॅटेलाईटमधून काढलेले काही फोटोदेखील समोर आले आहेत. ज्यात जैशची तळ उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे.