India China : चीनला वठणीवर आणण्यासाठी सज्ज आहे भारत; 35 दिवसांत केली 10 क्षेपणास्त्रांची चाचणी
India china Border tension - प्रत्यक्ष ताबारेषेवरून चीन मागे हटत नसल्याचं पाहून भारताच्या DRDO ने स्वदेशी मिसाइल्सची एका पाठोपाठ एक चाचणी करण्याचा धडाका लावला आहे. कशी आहे आपली शस्त्रसज्जता?


पूर्व लडाखमध्ये चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर भारताने शस्त्रसज्जता वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.


एक महिन्यात भारताने DRDO च्या मदतीने अनेक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. दर चार दिवसांच्या अंतराने भारताने चाचण्या केल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.


LAC वर चीनच्या सैन्याबरोबरचा तणाव वाढल्यानंतर स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांची सज्जता भारताने तयार ठेवली आहे. यामध्ये अण्वस्त्रसज्ज व्हेइकल आणि पारंपरिक क्षेपणास्त्र या दोन्हीच्या यशस्वी चाचण्यांकडे DRDO चा कल आहे.


लष्कर, नौदल आणि हवाई दल तिन्ही दलांना उपयुक्त अशी क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र वाहून नेणारी वाहनं भारताने गेल्या काही दिवसात सज्ज ठेवली आहेत.


7 सप्टेंबरला भारताने हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटेड व्हेइकलची चाचणी केली. HSTDV ची यशस्वी चाचणी करणारे जगात अमेरिका, रशिया, चीन आणि आता भारत असे फक्त 4 देश आहेत.


त्यानंतर फक्त चार आठवड्यात सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्राह्मोसचं विस्तारित रूप असलेलं क्षेपणास्त्र DRDO ते तयार केलं आणि त्याचीही यशस्वी चाचणी झाली.


त्यानंतर अण्वस्त्र नेण्याची क्षमता असणाऱ्या शौर्य या सुपरसोनिक मिसाइलची चाचणी करण्यात आली. K-15 क्षेपणास्त्राचं हे जमिनीवरचं रूप आहे. 1000 किलोपर्यंत पेलोड क्षमता असणाऱ्या या शौर्यची रेंज 1000 किमीपर्यंत पोहचू शकते.


DRDO ने त्यानंतर अण्वस्त्रसज्ज बॅलिस्टिक मिसाइल पृथ्वी 2 चीसुद्धा यशस्वी चाचणी केली. पृथ्वी पहिली भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र आहेत.


9 ऑक्टोबरला भारताने पहिलं स्वदेशी अँटीरेडिएशन क्षेपणास्त्र रुद्रम 1 ची चाचणी यशस्वी करून दाखवली. या मिसाइलमुळे भारतीय हवाई दलाची ताकद वाढली आहे.