लोकसभा निवडणुकांचे पडघम : 'या' 3 महिलांपासून मोदींना आहे धोका
2019च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर 3 महिला मोठं आव्हान उभं करू शकतात. कोण आहेत त्या?
|
1/ 11
येत्या लोकसभा निवडणुकीत या तीन राजकारणी महिला भाजपची डोकेदुखी वाढवणार, अशी चिन्हं आहेत. पंतप्रधान मोदी यांना आव्हान देण्यासाठी प्रियांका गांधी, मायावती आणि ममता बॅनर्जी या तिघींनी कंबर कसली आहे.
2/ 11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रियांका गांधींच्या लोकप्रियतेचं आव्हान असणार आहे
3/ 11
नेहरू - गांधी घराण्याच्या प्रियांक गांधी - वड्रा उत्तर प्रदेशात भाजपची डोकेदुखी वाढवणार आहेत.
4/ 11
प्रियांका माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे दिसतात. त्याचा फायदा देखील काँग्रेसला होऊ शकतो. काँग्रेसनं प्रियांका गांधी - वाड्रा यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह पाहायाला मिळत आहे.
5/ 11
मास अपील असलेला चेहरा म्हणून प्रियांका गांधी- वड्रा यांच्याकडे पाहिलं जातंय. त्यांचा बहुप्रतीक्षित सक्रिय राजकारण प्रवेश भाजपसमोर आव्हान निर्माण करू शकतो.
6/ 11
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी देखील मोदींना थेट आव्हान दिलं आहे.
7/ 11
भाजपविरोधी आघाडी उभी करण्यामध्ये देखील ममता बॅनर्जींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
8/ 11
ममता बॅनर्जी यांनी दोन वेळा रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
9/ 11
बसपच्या सर्वेसर्वा मायावती देखील नरेंद्र मोदी यांच्यासमोरील मोठं आव्हान असणार आहे.
10/ 11
दलित, मुस्लीम मतांवरती मायावती प्रभाव पाडू शकतात. उत्तर प्रदेशाबरोबर इतर काही राज्यांतही बसपची जादू काम करू शकेल.
11/ 11
उत्तर प्रदेशमध्ये बसपा आणि सपानं युती करत 74 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. रायबरेली आणि अमेठीतील जागा मात्र सोडण्यात येणार आहेत.