

हैद्राबादमध्ये काच्चीगुडा स्थानकात लोकल आणि एक्स्प्रेसची समोरासमोर धडक झाल्यामुळे मोठी दुर्घटना.


सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे समोरून येणाऱ्या ट्रेनला कोणताही संदेश मिळाला नाही त्यामुळे ही दुर्घटना घडली.


सकाळी 11.45 मिनिटांनी हा अपघात घडला. ही धडक इतकी भीषण होती की लोकलच्या समोरच्या डब्ब्याचं मोठं नुकसान झालं.


या दुर्घटनेमध्ये 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.


एकाच ट्रॅकवरून दोन्ही ट्रेन कशा चालवल्या जात होत्या? सिग्नलमधील बिघाडाची कल्पना देण्यात आली नव्हती का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


य़ा प्रकरणी योग्य ती चौकशी करून रेल्वेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.


ही धडक इतकी भीषण होती की लोकलच्या समोरच्या डब्ब्याचं मोठं नुकसान झालं. डब्यात अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात यश.


या दुर्घटनेमध्ये 10 जण गंभीर जखमी तर ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.