

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. पण, या साऱ्या गोष्टी होत असताना मुलं दत्तक घेण्यामध्ये भारतानं जगात बाजी मारली आहे.


महिला बाल विकास मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार 2015 ते 2018 या काळात 11,649 मुलं दत्तक घेण्यात आली. ज्यामध्ये 6,962 मुली आणि 4,687 मुलं आहेत. एकूण दत्तक मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या 60 टक्के जास्त आहे.


मुलाखती दरम्यान देखील अनेक पालकांनी दत्तक घेण्यासाठी मुलींनी पसंती दिलेली होती. त्यामुळे मुली दत्तक घेण्याकडे कल वाढत असल्याचं दिसून येतं.


2015 – 16 मध्ये 3,011 मुलांना दत्तक घेतलं गेलं. ज्यामध्ये 1,855 मुली होत्या. 2016-17साली 3,210 मुलांना दत्तक घेतलं गेलं. ज्यामध्ये 1,915 मुली होत्या. 2017 - 2018 या काळात 3,276 मुलं दत्तक घेतली गेली, ज्यामध्ये 1943 मुली होत्या. ( आकडेवारी डिसेंबर 2018 पर्यंतची आहे )


2015 ते 2018 याकाळात परदेशातील नागरिकांनी 2,310 मुलं दत्तक घेतली. ज्यामध्ये 1,594 मुली आहेत. खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे.