दिल्लीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर वापरले Water Cannon; किती घातक असतात हे पाण्याचे फवारे?
आधुनिक वॉटर कॅननमधून (Water Cannon) एकावेळी 10 हजार लीटर पाण्याचा मारा करता येऊ शकतो. यामध्ये एका सेकंदाला 20 लीटर पाणी निघत असल्याने हे किती घातक आहे याचा विचार तुम्ही करू शकता.


शेतकरी विधेयकावरून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर पोलीस मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करत आहेत. थंडीच्या दिवसात शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करत असल्याने पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. परंतु केवळ भारतातच नाही तर जगभर विविध ठिकाणी आंदोलकांना हटवण्यासाठी याचा वापर केला जातो. काय हे हे याची आज आपण माहिती घेणार आहोत. सांकेतिक फोटो


वॉटर कॅनन मधून वेगाने पाण्याचे फवारे उडतात. त्याचा स्पीड खूप जास्त असल्याने काही मीटर लांब ही पाण्याची धार जाऊ शकते. सर्वसामान्यपणे वॉटर कॅननचा वापर आग विझवण्यासाठी, आंदोलकांना रोखण्यासाठी किंवा खोदकामाच्या वेळेस होतो. मोठ्या वाहनांना साफ करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. (सांकेतिक फोटो)


सुरुवातीला फायरबोटमध्ये वापरण्यासाठी वॉटर कॅननची निर्मिती करण्यात आली होती. पाण्याजवळ असणाऱ्या नावा आणि इमारतींमधील आग विझवणे सोपं नव्हतं. त्यावेळी फायरबोट तयार झाले नव्हते. 1919 मध्ये लॉस अँजेलिसला पहिली फायरबोट मिळाली. तर न्यूयॉर्क शहरात पाहिली फायरबोट 1891 मध्येच आली होती. याच पद्धतीने फायर ट्रक होते. यामध्ये देखील कॅनन प्रमाणेच वेगाने पाणी फेकण्याची क्षमता असल्याने आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी याचा वापर केला जातो. सांकेतिक फोटो (news18 English via PTI)


आग विझवण्यासाठीच्या या साधनांचा वापर आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी कधीपासून केला जाऊ लागला याची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. 1930 मध्ये जर्मनीमध्ये आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी सर्वात आधी याचा वापर करण्यात आला होता. तेव्हापासून यामध्ये विविध बदल करण्यात आले असून आता ऑपरेट करणारा व्यक्ती यापासून सुरक्षित असून त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. जॉयस्टिकच्या माध्यमातून देखील तो त्याचे काम करू शकतो. (सांकेतिक फोटो - news18 English via PTI )


जर्मन वॉटर कॅनन एकावेळी सर्व दिशांना जवळपास 10,000 लीटर पाण्याचा मारा करू शकते. त्याचबरोबर एका गाडीत एकाचवेळी तीन कॅनन लावता येऊ शकतात. लांब उभे राहून जॉयस्टिकच्या मदतीने कर्मचारी हे चालू करतो जेणेकरून त्याला धोका निर्माण होऊ नये. यामधून सेकंदाला 20 लिटर पाणी निघत असल्याने हे किती घातक आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता. सांकेतिक फोटो (CNN)


पाण्याच्या या वेगवान धारेमुळे जखमी होण्याची, आजारी पडण्याची आणि मृत्यू होण्याची देखील भीती आहे. इंडोनेशियामध्ये 1996 मध्ये कॅननमध्ये अमोनिया टाकल्याने या प्रकारची घटना घडली होती. 2013 मध्ये तुर्कीमध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्यामुळे लोकांना त्रास झाला होता. युक्रेनमध्ये देखील आणखी एक धोकादायक प्रकरण समोर आले होते. त्यावेळी प्रदर्शनादरम्यान पाण्याचा मारा केल्याने एका व्यावसायिकाचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला होता. दक्षिण कोरियामध्ये 2016 मध्ये पाण्याच्या धारेने जखमी झाल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सांकेतिक फोटो (Pixabay)


वॉटर कॅननमध्ये विविध प्रयोग देखील करण्यात आले आहेत. 1997 मध्ये दक्षिण कोरियात आंदोलनकर्त्यांची ओळख पटण्यासाठी पाण्यात गुलाबी रंग टाकण्यात आला होता. आयर्लंड पोलिसांनी देखील वांगी कलरचा वापर अशाच पद्धतीने केला होता. नवीन कॅननमध्ये पाण्याबरोबरच अश्रुधुराच्या नळकांड्या देखील सोडता येण्याची व्यवस्था आहे. सांकेतिक फोटो (Picryl)