West Bengal Elections: गृहमंत्री अमित शहा यांनी आज ( 18 फेब्रुवारी ) कोलकाता दौऱ्यावर असताना एका निर्वासित कुटुंबाच्या घरी सर्व सहकाऱ्यासमवेत दुपारचं जेवण घेतलं.
|
1/ 4
पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तोंडावर गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी आपल्या दौऱ्यात नारायणपूर गावाला भेट दिली. तिथं एका निर्वासित कुटुंबासोबत त्यांनी जेवण केलं. ( Image - ANI)
2/ 4
यावेळी अमित शहा यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी तसंच पश्चिम बंगालचे कार्यकारी अधिकारीसुद्धा उपस्थित होते. ( Image - ANI )
3/ 4
अमित शहा सध्या पश्चिम बंगालच्या दौर्यावर आहेत. तिथं ते भारतीय जनता पक्षाच्या परिवर्तन यात्रेच्या पाचव्या टप्प्याचे ध्वजारोहण करतील. ( Image - ANI )
4/ 4
तिथून प्रार्थना करण्यासाठी शहा यांनी गंगासागरच्या कपिल मुनी आश्रमातही भेट दिली. यावर्षी विधानसभेच्या 294 जागांसाठी निवडणुका होणार आहेत त्यासाठी पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. ( Image - ANI )