पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 10.45 च्या सुमारास तामिळनाडूच्या जनतेकडून सेंगोलचा स्वीकार केला अशी माहिती शाह यांनी दिली. इंग्रजांकडून या देशातील जनतेकडे सत्ता हस्तांतरित होण्याचे ते लक्षण होते. ते अलाहाबाद येथील संग्रहालयात ठेवण्यात आले असून ते नवीन संसद भवनात हलविण्यात येणार असल्याचेही शाह म्हणाले.