गुलाब या चक्रीवादळामुळे होत असलेल्या पावसाने कोडरमा मध्ये जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यामुळे विजेचे खांबही उखडून पडले होते. कोडरमामध्ये संततधार पावसामुळे रेल्वे कॉलनीतील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळं घरातील भांडी आणि इतर सामान हे या पाण्यावर तरंगू लागले होते. घरातील बेडरुममध्ये पाणी शिरल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. यामुळे घरातील साहित्यांचंही नुकसान झालं आहे. कोडरमामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे कॉलनीतील घरात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे चक्रीवादळासह पूरस्थिती या भागात तयार झाली होती. महापूरामुळे रेल्वे कॉलनीत सर्वत्र पाणी भरल्याने लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांना घरातच अडकून रहावं लागत आहे.