या गुंतागुंतीच्या ऑपरेशनबद्दल डॉक्टरांनी सांगितलं की, मुलीची तपासणी केली असता, मुलीच्या डोक्यात आणि जबड्यात डबा अडकल्याचं दिसून आलं. टिफिनमध्ये साबणाची वडी असल्याने मुलाला श्वास घेण्यासही त्रास होत होता. मुलीचं तत्काळ सिटी स्कॅन करण्यात आलं, ज्यामध्ये टिफिनचा मोठा भाग कपाळ आणि जबड्यात अडकल्याचं आढळून आलं.
जर डबा ड्रिलने कापला असता, तर त्याच्या कंपनांमुळे मुलीच्या मेंदूला गंभीर इजा होऊन मृत्यूही ओढवू शकला असता, असं डॉक्टरांनी सांगितलं. अशा परिस्थितीत मेटल बार आणि मेटल डिस्कच्या सहाय्याने टिफनचे दोन भाग करण्याचं ठरवलं, जेणेकरून कटिंगमुळे होणाऱ्या कंपनांनी मेंदूच्या भागाला इजा होऊ नये. यानंतर, डबा मधून कापून दोन भाग करण्यात आले.