हरयाणातील कैथल जिल्ह्यातील हा रेडा 'नवाबी' आयुष्य जगला. अलीकडेच काही दिवसांपूर्वी त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. या रेड्याचं नाव 'सुलतान' असं होते. कैथलच्या बुडाखेडा गावातील सुलतान या रेड्याने केवळ कैथलच नव्हे तर संपूर्ण हरयाणाचे नाव रोशन केले. त्याचे मालक नरेश सांगतात की सुलतानप्रमाणे कोणीही नव्हते आणि कदाचित कोणीही नसेल.