गुजरातच्या भूजमध्ये राहणाऱ्या मालधारी परिवारात या आश्चर्यकारक वासराचा जन्म झाला आहे. हे वासरू केवळ 9 महिन्यांचं आहे. ते आईचं दूध पितं आणि स्वतःदेखील दूध देतं. वास्तविक, वासराचा जन्म झाल्यानंतर त्याच्या पोटी दुसरं वासरू जन्माला यायला किमान चार वर्ष जावी लागतात. त्यानंतर एक ते दीड वर्षं गायीचं दूध उत्तम दर्जाचं मानलं जातं.