निवृत्त झाल्यानंतर कर्मचारी भविष्य निधी अर्थात ईपीएफओ हा मोठा आधार असतो. नोकरीवरुन काढल्यानंतर अथवा नोकरी गेल्यानंतर तुम्ही ईपीएफओ खात्यातून आता 75 टक्के एका महिन्यात काढू शकतात. ६ डिसेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. सध्याच्या नियमानुसार तुम्ही दोन महिन्यानंतरही रक्कम काढू शकता.
2/ 4
पीएफ नियम - गंभीर आजाराच्या खर्चासाठी, मुलांचे शिक्षण, घर खरेदी आणि लग्नासाठी पैसे काढता येतात. हा नियम राज्य आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही लागू आहे.
3/ 4
ईपीएफओची नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी सांगितलं की, जर तुमची नोकरी गेली आणि तुम्ही बेरोजगार झाला तर एका महिन्यात तुम्हाला 75 टक्के रक्कम काढण्यासाठी मुभा दिली आहे.
4/ 4
सरकारच्या निर्णयाचा झाला होता विरोध - नोकरी सोडल्यानंतर 58 वर्षांपर्यंत पीएफ काढता येणार नाही असा नियम होता. आणि 1 मे 2016 पासून लागू होणार होता. त्यानंतर या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केला त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.