

सोन्याच्या किंमतीतील घट मागच्या काही दिवसांपासून सुरुच आहे. सराफा बाजारात सध्या सोन्याची किंमत आणखी घसरणार असून ती 32,500 प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतकवणूकदारांचा सोन्याच्या गुंतवणूकीमधील कमी होईल असं जाणकारांचं मत आहे.


20 फेब्रुवारी पर्यंत दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत 34,975 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. पण आता मार्चमध्ये ती कमी होऊन 33,110 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचली आहे. म्हणजे दिल्लीच्या साराफा बाजारात सोनं सध्या 1865 रुपयांनी स्वस्त झालं आहे.


लहान ज्वेलर्स कडून सोन्याच्या मागणीत वारंवार घट होत आहे. तसेच जागतिक स्तरावर ट्रेड वॉर कमी झालं. त्यामुळे सोन्याच्या किंमत घटत असल्याचं एसकोर्ट सेक्युरिटी हेड आसिफ इकबाल यांनी सांगितलं.


डॉलरची किंमत अन्य चलनांच्या तुलनेत कमी होत आहे. त्यामुळे सोन्याची किंमतही कमी होत आहे. पुढील 15 दिवसात ही किंमत आणखी कमी होऊन 32,500 प्रति दहा ग्रॅमवर जाऊ शकते, असं आसिफ यांचं म्हणणं आहे.