अंबाला येथे झालेल्या या जबरदस्त अपघातात कारमध्ये असलेल्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य तिघे गंभीर जखमी झाले. मृत्यू झालेली व्यक्ती कार चालवत होती. मुली मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघात झाल्यावर तिथे उभ्या असलेल्या लोकांनी मुलींच्या गाडीला घेराव घातला.
जेव्हा त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं, तेव्हा तिथेही त्यांनी खूप ड्रामा केला. रेंज रोव्हरमधील दोन्ही मुली नशेत होत्या की नाही, हे मेडिकलनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, पोलीस ठाण्यात गेल्यानंतरही त्यांचे उपद्व्यार कमी झाले नाहीत. त्यांनी मीडियाचा कॅमेरा पाहून आधी तोंड लपवायला सुरुवात केली. मग उलट पोलिसांवरच आरोप करायला सुरुवात केली.
या अपघातात सापडलेली कार हिमाचल प्रदेशातील क्रमांकाची होती. त्या कारमध्ये चार जण होते. ही टक्कर इतकी भीषण होती की कार चालवत असलेल्या त्या कुटुंबातील प्रमुखाचा जागीच मृत्यू झाला. या धडकेमुळे कारमध्ये असलेली दोन लहान मुले कारमधून खाली पडली. कारमधील महिलेने जखमी अवस्थेत मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर ही संपूर्ण कहाणी सांगितली.