नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्व राज्यांमध्ये डिजीटल लायब्रेरीसाठीही तरतूद केली आहे. पण त्याआधीच उत्तर प्रदेशच्या नोएडामधील लायब्रेरी मॅनने त्या दिशेने पाऊलही टाकलं.
2/ 7

3/ 7
उत्तर प्रदेशच्या नोएडातील रामवीर तंवर जे लायब्रेरी मॅन म्हणून ओळखले जातात. गेल्या पाच वर्षांपासून ते प्रत्येक गावात डिजीटल लायब्रेरी सुरू करण्याचं काम करत आहेत.
4/ 7
त्यांनी गौतमनगर बुद्ध जिल्ह्यातील आपल्या झुंडपुरा गावात 2018 साली पहिली मोफत डिजीटल लायब्रेरी उघडली. हे ठिकाण एकेकाळी गावाजवळील वस्तीत राहणाऱ्या मुलांसाठी नशेचं केंद्र होतं.
5/ 7
ग्रामस्थांना लायब्रेरीचं महत्त्व समजावलं. त्यानंतर पैसे जमवून ही लायब्रेरी उभी केली. पुस्तकं, वायफाय, विजेचा खर्च, लॅपटॉप आणि मोबाईल फोनचा खर्च सर्व काही ग्रामस्थ पैसे जमवून करतात.
6/ 7
लहान मुलांसाठी ही लायब्रेरी मोफत आहेत. इथं 100 मुलं बसतील इतक्या सीट्स आहेत.
7/ 7
मुलांचं भविष्य खराब होताना पाहून या डिजीटल लायब्रेरीचा पाया रचला. आता प्रत्येक गावात लायब्रेरी उघडायची आहे, असं रामवीर तंवर म्हणाले.