

पुलवामा इथं दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्लाचा भारताने हवाई हल्ला करून बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे. या कारवाईत ड्रोनचा उपयोग झाला. जाणून घेऊ या अशा काही ड्रोनबद्दल


हेरोन- IAI Heron (Machatz-1) इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजच्या Malat डिव्हिजननं विकसित केलेल्या मध्यम उंचीचा, मानवविरहित असा ड्रोन आहे. हे 10.5 किमी. उंचीवर उडू शकतं. हवेत 52 तास उडतं. ग्राऊंडवरचं कनेक्शन तुटलं तर हे ड्रोन आपोआप आपल्या जागी परत येतं.


हार्पी - हा ड्रोन इस्रायलनं बनवलाय. हा ड्रोन स्फोटकं घेऊन जाऊ शकतो. हा रडार नष्ट करू शकतं. हार्पीला दक्षिण कोरिया, तुर्की, भारत आणि चीनसहित इतर देशांना विकलेत.


AEW&C - एयरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल नावाच्या ड्रोनमध्ये घरगुती टेक्नाॅलाॅजी वापरलीय. कुठल्याही धोक्याची सूचना हा ड्रोन करून देतो.