

अमृतसरजवळच्या जोडा फाटक इथं रविवारी मृतांच्या नातेवाईकांनी निदर्शन करत धुडगूस घातला. पोलिसांनी बळाचा वापर करता निदर्शकांना पांगवलं. त्यानंतर वातावरण शांत झालं.


परिस्थिती शांत झाल्यानंतर व्यस्त असलेल्या या मार्गावर रविवारी पहिली ट्रेन धावली. सुरवातीला मालगाडी धावली आणि नंतर पॅसेंजर ट्रेन. मात्र त्यात प्रवासी नव्हते. शुक्रवार रात्रीच्या घटनेनंतर पहिल्यांदाच वाहतूक सुरू झाली.


पीडितांच्या नातेवाईकांनी रविवारी जोरा पाडा इथं जोरदार निदर्शनं केली होती. सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही त्यांनी केली.


पोलिसांनी निदर्शकांना मार्ग मोकळा करण्याचं आवाहन केलं, मात्र ते हटायला तयार नव्हते. शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.


निदर्शकांनी गोंधळ घालत आजुबाजूच्या परिसरात धुडगूस घातला. दगडफेकही केली त्यात काही इमारतींच्या काचाही फुटल्या.


पोलीसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती आटोक्यात आणली. तेव्हा कुठे या मार्गावर वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.