

पाच दिवसांआधी बोअरवेलमध्ये पडलेल्या 2 वर्षाच्या चिमुकल्याला अखेर मंगळवारी बाहेर काढण्यात यश आलं पण त्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या चिमुकल्याचा 10 जूनला वाढदिवस होता. त्यासाठी चिमुकल्याच्या घरच्यांकडून एक व्हिडिओही तयार करण्यात आला होता.


बोअरवेलमध्ये पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी बचाव पथकाने तब्बल 110 तास रेस्क्यू ऑपरेशन केलं पण तरीही बाळाला बाहेर काढण्यात यश आलं नाही.


अखेर, मंगळवारी बाळाला बाहेर काढण्यात यश आलं. त्याला तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. 5 दिवस बोअरवेलमध्ये असल्यामुळे बाळाच्या अंगाला सूज आली होती. तर त्याच्या हृदयाचे ठोके कमी होत असल्यामुळे त्यात त्याचा मृत्यू झाला.


फतेहवीर असं 2 वर्षाच्या मुलाचं नाव आहे. पाच दिवसांआधी तो 150 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. फतेहवीरला बोअरवेलमध्ये पडलेलं पाहताना त्याच्या आईने पाहिलं. पण त्याच्याजवळ पोहचण्याआधीच तो बोअरवेलमध्ये खोलवर गेला होता.


याची माहिती स्थानिकांना देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाकडूनही बाळाला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. पण त्यात त्यांना अपयश आलं. एनडीआरएफच्या टीमकडून बाळाला बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. अखेर 110 तासांच्या प्रयत्नांनतर मंगळवारी बाळाला बाहेर काढण्यात यश आलं पण त्याचा जीव वाचवता आला नाही.


रेस्क्यू ऑपरेशन करताना फतेहवीरला ऑक्सीजन पुरवण्यात यश आलं होतं. पण त्याच्यापर्यंत जेवन आणि पाणी पोहचवता आलं नाही. त्यामुळे 2 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.