

मुंबईच्या प्रभादेवी याठिकाणच्या सिद्धीविनायक मंदिर देवस्थानाकडून राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 5 कोटींचे दान करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या काळामध्ये ज्या रुग्णांना रक्ताची गरज आहे त्यांच्यासाठी रक्त संकलनाची जबाबदारी देखील देवस्थानाने घेतली होती


शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाच्या ट्रस्टने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 51 कोटींची मदत देऊ केली आहे.


हरियाणामधील पंचकुला याठिकाणी असणाऱ्या माता मानसी देवी मंदिराने राज्याच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये 10 कोटींचे दान दिले आहे.


देवी वैष्णोदेवी मंदिरातील नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांनी त्यांच्या एका दिवसाचा पगार जम्मू-काश्मीर सहाय्यता निधीमध्ये दिला आहे


छत्तीसगडमधील प्रसिद्ध महामाया मंदिर ट्रस्टने 5 लाखापेक्षा जास्त निधी राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिला आहे.