नवी दिल्ली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर बुधवारी त्यांना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयातील (LNJP Hospital) आयसीयूमध्ये भर्ती करण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितले की आम आदमी पार्टी (AAP) चे 48 वर्षीय नेता मनीष सिसोदिया यांच्या शरीरातून ऑक्सीजनचा स्तर कमी झाला होता, त्याशिवाय ताप असल्याने सायंकाळी साधारण चार वाजता त्यांना लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. (फाइल फोटो)
उपमुख्यमंत्र्यांना 14 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते होम आयसोलेशनमध्ये होते. संसर्ग असल्याने ते 14 सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच्या एक दिवसीय सत्रात सहभागी होऊ शकले नाही. बुधवारी त्यांनी ट्विट करीत कोंडलीचे आमदार कुलदीप कुमार यांच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (फाइल फोटो)