

अम्फन चक्रीवादळ दुपारी अडीच वाजता पूर्व किनारपट्टीवर धडकलं. पहिल्या चार तासांतच या वादळाने कहर केला.


बंगालच्या उपसागरात घोंंघावत असलेलं अम्फन (Cyclone Amphan) चक्रीवादळ दुपारी अडीच वाजता जमिनीला धडकलं.


किनारपट्टीवर ताशी 160 ते 170 किमी वेगाने वारे वाहात होते. कोलाकात्यालाही वादळी पावसाने झोडपलं.


वादळ धडकण्याच्या आधी कोलकात्याच्या हुगळी नदीत डुबक्या मारणारा हा माणूस टिपलाय AP च्या छायाचित्रकाराने


5000 वर घरांचं नुकसान झालं. शेकडो झाडं जमीनदोस्त झाली. अंगावर झाड पडून पश्चिम बंगालच्या हावडा आणि २४ परगणा जिल्ह्यांत दोन महिला मृत्युमुखी पडल्या.


या शक्तीशाली चक्रीवादळाला सुपर सायक्लॉन म्हटलं गेलं. या वादळाचा परिणाम संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर दिसला. त्यानंतर वादळाचा वेग थोडा कमी झाला.


वादळ धडकल्यानंतर वाऱ्यांचा वेग तुफान वाढला आणि पाऊसही सुरू झाला. दुपारी अडीच वाजता वादळ धडकल्यानंतर (Lanfall) पुढचे चार तास हाहाकार सुरू होता.