शहिद झालेल्या मित्राला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी थेट लग्नमंडपात पोहोचले CRPF जवान,पाहा PHOTO
Raebareli News : उत्तर प्रदेशात झालेलं एक लग्न चांगलाच चर्चेचा विषय बनलेला आहे. देशासाठी शहिद झालेल्या शैलेंद्र प्रताप सिंह या सैनिकाच्या बहिणीच्या लग्नाच चक्क CRPF जवानांनी हजेरी लावली आहे. त्यामुळं आता त्यांच्या या कृतीचं सोशल मीडियावर फार कौतूक होत आहे.
आपला भाऊ सैन्यात असताना शहिद झाला म्हणून तिच्या बहिणीला लग्नात त्याची कमतरता जाणवू नये म्हणून CRPF जवानांनी लग्नात हजरी लावली. त्यामुळं या लग्नाची आता चांगलीच चर्चा होत आहे.
2/ 5
उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये झालेल्या या अनोख्या लग्नात नवरीचा भाऊ हा मागच्या वर्षी जम्मूत आतंकवादी हल्ल्यात शहिद झाला होता. त्यामुळं त्याच्या बहिणीचं लग्न पार पाडण्यासाठी CRPF चे जवान मंडपात आले होते.
3/ 5
शहीद झालेल्या शैलेंद्रची बहिण ज्योती च्या लग्नामध्ये त्याच्या सोबत देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. ज्योतीला लग्नात उपस्थित राहिलेल्या या भावांबद्दल अभिमान वाटला आहे.
4/ 5
शहिद झालेल्या शैलेंद्र सिंह चे वडिल नरेंद्र बहादुर सिंह या प्रसंगी भावनिक झाले परंतु या लग्नाला जवानांनी लावलेल्या हजेरी बद्दल त्यांनी अभिमान वाटल्याचंही सांगितलं आहे.
5/ 5
लग्नाला आलेल्या या सैनिकांनी शहीद बहिणीला आपल्या बहिणीप्रमाणे निरोप तर दिलाच शिवाय वधू-वरांना सोन्याच्या अंगठ्यांसारख्या मौल्यवान भेटवस्तूही दिल्या.