देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे. रविवारी देशातल्या एकूण रुग्णांचा आकडा हा 26 लाख एवढा झाला आहे. देशात रविवार संध्याकाळपर्यंत एकूण 26 लाख 34 हजार 256 एवढे रुग्ण झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 44 हजार 574 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 865 लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी विक्रमी 63 हजार नवे रुग्ण आढळून आले होते तर 944 जणांचा मृत्यू झाला होता. आत्तापर्यंत 19 लाख 04 हजार 612 रुग्ण बरे झाले आहे. तर तब्बल 50 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्ण वाढत असले तरी मृत्यूचं प्रमाण कमी झालं असून मृत्यूदर 1.93 टक्के एवढा झाला आहे. देशातल्या Active रुग्णांच्या प्रमाणातही घट झाली असून ते प्रमाण 26.16 टक्के एवढं झालं आहे. तर रिकव्हरी रेट 71.91 एवढा झाला आहे.