

कोरोना काळातच हे वर्ष सरत असताना अखेरच्या टप्प्यात कोरोनाची दहशत आणखीन वाढली आणि ख्रिसमस आणि New year वरही हे सावट कायम राहणार आहे. Christmas 2020 सेलिब्रेशन कसं पार पडलं त्याचे काही फोटो समोर आले आहेत.


भारतात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क या दोन्हीचा योग्य वापर करून ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थना केली. गुरुवारी चर्चमध्ये लोकांची वर्दळ पाहायला मिळाली. यावेळी लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं होतं.


पश्चिम बंगालमध्ये देखील ममत बॅनर्जी यांनी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कॅथेड्रल ऑफ द मोस्ट होली रोजरी चर्च इथे प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सणामुळे पुन्हा एकदा उत्साह भरून आल्याची भावाना देखील ममता बॅनर्जींनी व्यक्त केली आहे.


गुजरातमध्ये ख्रिसमसच्या सेलिब्रेशनवर कोरोनामुळे बंदी घालण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील चर्चमध्ये केवळ 50 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.