Delhi Weather Update : दिल्लीत थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी किमान तापमान 7.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी किमान तापमान पाच अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. पाहा PHOTOS
मागच्या रविवारी राजधानी दिल्लीत किमान तापमान 6.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं. जे या हंगामातलं सर्वात कमी तापमान आहे. त्याच वेळी हवेची गुणवत्ता आजही 'अत्यंत खराब' श्रेणीत राहिली.
2/ 5
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी सांगितलं की हवामानशास्त्रज्ञांनी दिवसभरात आकाश निरभ्र राहील आणि कमाल तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज वर्तवला आहे.
3/ 5
हवामान खात्याच्या दिलेल्या माहितीनुसार शनिवार व रविवारपर्यंत किमान तापमानात पाच अंशांनी घट होऊ शकते, त्यामुळे कडाक्याची थंडी असेल.
4/ 5
मागच्या आठवड्यापासून राजधानी दिल्लीतील तापमानात घट होत आहे. त्यामुळं आता थंडीचा जोर वाढत असतानाही हवेची गुणवत्ता सुधारलेली नाही, त्यामुळं चिंता व्यक्त केली जात आहे.
5/ 5
त्याचवेळी 'सफर'ने पुढील दोन दिवस दिल्लीतील हवेची गुणवत्ता 'खराब' राहण्याची शक्यता वर्तवली आहे.