लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केल्यानंतर त्या सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग कामाला लागले आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता त्यावरही आयोग नजर ठेवून आहे.
2/ 7
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारच्या आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी आयोगाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.
3/ 7
लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसह इतरांकडून सोशल मीडियाचा दुरूपयोग होऊ नये यासाठी आयोगाने सोशल मीडिया कंपन्यांची बैठक बोलावली होती. यात सोशल मीडियावरही आचार संहिता लागू करण्यावर चर्चा झाली होती.
4/ 7
फेसबूक, ट्विटरसह इतर सोशल मीडिया, मोबाइल आणि इंटरनेट कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी झालेल्या बैठकीत आचार संहिता लागू करण्याबाबत चर्चा झाली.
5/ 7
यामुळे स्वतंत्र, निपक्षपातीपणे शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आचारसंहितेचे पालन होण्यास मदत होईल.
6/ 7
निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या धर्तीवरच ही आचारसंहिता तयार करण्यात आली आहे.
7/ 7
निवडणुक आयोगाच्या बैठकीत इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया, फेसबुक, व्हॉटसअप, ट्विटर, गूगल, शेअरचॅट, टिक टॉक, बिग टीव्ही यांसारख्या सोशल मीडियाच्या प्रतिनिधींचा समावेश होता.