

काही आठवड्यात भारतात कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं आता मोदी सरकारनं लशीकरणाची तयारी सुरू केली आहे. कोरोना लशीचं वितरण करण्यासाठी CO-WIN हा कॉप्युटराइज्ड प्रोग्रॅम तयार करण्यात आला आहे. CO-WIN APP ही तयार करण्यात आलं आहे.


लस कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणि लसीकरणात प्राधान्य मिळणाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसं कळवून त्यांच्याकडून यासंदर्भातला डेटाबेस मागवण्यात येणार आहे.


हा डेटाबेस CO-WIN नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये घालून अत्यंत काटेकोर पद्धतीने लशीकरण राबवण्यात येईल, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं.


मोदी सरकारने लशीकरण कसं राबवायचं हे ठरवण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली होती. National Expert Group on Vaccine Administration कमिटी म्हणजे NEGVAC ने या पद्धतीने लोकसंख्येचं वर्गीकरण करून प्राधान्यक्रम कुणाला हे ठरवलं आहे.


आरोग्य मंत्रालय या समितीच्या सूचनांचं पालन करूनच लशीकरण मोहीम राबवेल, अशी माहिती आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकारांना दिली.