मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » PHOTOS : सम्राट अकबरचा निकटवर्तीय होता हा हिंदू राजा, ज्यांच्यामुळं वाचलं होतं हे प्रसिद्ध मंदिर

PHOTOS : सम्राट अकबरचा निकटवर्तीय होता हा हिंदू राजा, ज्यांच्यामुळं वाचलं होतं हे प्रसिद्ध मंदिर

राजस्थानात आजही राजा मानसिंगच्या कथा सांगितल्या जातात. त्यांच्याबद्दल अनेक किस्से आहेत. राजा मानसिंग हे सम्राट अकबरचे चांगले मित्र होते आणि त्यांचा दरबारातील नवरत्नांमध्ये समावेश होता. मानसिंग एक हुशार योद्धा होता. त्यांनी अकबरासाठी अनेक लढाया केल्या. त्यानंतर बंगालमधील एका लढाईत त्यांचा मृत्यू झाला होता.