काय डोकं आहे राव! तस्करीसाठी शेंगदाण्यात लपवल्या 45 लाखांच्या नोटा आणि...
दिल्ली विमानतळावर रोज तस्करीचे प्रकार घडत असतात. एका देशातून दुसर्या देशातून सोने किंवा परकीय चलन घेऊन जाण्यासाठी लोक विविध युक्त्या काढतात.
|
1/ 6
दिल्ली विमानतळावर रोज तस्करीचे प्रकार घडत असतात. एका देशातून दुसर्या देशातून सोने किंवा परकीय चलन घेऊन जाण्यासाठी लोक विविध युक्त्या काढतात. मात्र एका अवलियानं तस्करीसाठी वापरलेली आयडिया पाहून विमानतळावरील कर्मचारी हैराण झाले.
2/ 6
बुधवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षेमध्ये तैनात CISFच्या जवानांनी एका संशयिताला पकडले. त्याचा शोध घेतल्यानंतर त्याच्या बॅगमध्ये भुईमुगाच्या शेंगा, बिस्किटे आणि खाद्यपदार्थ सापडले.
3/ 6
खाद्यपदार्थ पाहून जवानांनी त्याला सोडले. मात्र त्यानंतर एका जवानाने शेंगा आणि बिस्किटचा पुडा फोडल्यानंतर त्यात चक्का नोटा आढळल्या. या सगळ्यात एक-दोन हजार नाही तर चक्क 45 लाखांच्या नोटा लपवल्या होत्या.
4/ 6
मुराद आलम असे या तस्करी करणाऱ्या व्यक्तिचे नाव असून बुधवारी एअर इंडियाच्या विमानाने दुबईला पळून जाण्यासाठी आला होता. मुराद आलम चेक इन एरियामध्ये असताना जवानांना संशय आला.
5/ 6
जवानांनी त्याच्या बॅगची तपासणी केल्यानंतर त्यात भुईमुगाच्या शेंगा, मटन करी आढळून आली. त्यात त्यानं चक्क 45 लाखांच्या नोटा लपवल्या होत्या.
6/ 6
तस्कर मुरानने लपवलेले हे परदेशी चलन दुबईला घेऊन जायचे होते. मात्र त्याआधीच त्याला अटक करण्यात आली होती.