भारतीय रेल्वे उत्तराखंडमधील चार धाम रेल्वे प्रकल्पाला गती देत आहे. उत्तराखंडमधील दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांमध्ये चार धाम यात्रेची चार महत्त्वाची ठिकाणं ऋषिकेश आणि कर्णप्रयाग शहराशी जोडण्यासाठी ब्रॉडगेज लाइन जोडणे समाविष्ट आहे. यासंदर्भात माहिती शेअर करताना रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाशी संबंधित अनेक फोटो शेअर केले आहेत.
या रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी नुकतीच उत्तराखंडला भेट दिली. त्यांनी ऋषिकेश-कर्णप्रयाग प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देऊन बोगद्याच्या कामाचा आणि ब्रॉडगेज लाइनचा आढावा घेतला. जरदोश यांनी त्यांच्या भेटीदरम्यान उत्तराखंडमधील रेल्वे नेटवर्कच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, दोन्ही रेल्वे प्रकल्पांमुळे राज्यात येणाऱ्या हजारो यात्रेकरू आणि पर्यटकांचा वेळ आणि प्रवास खर्च दोन्ही वाचणार आहेत.
या प्रकल्पांतर्गत सर्व चार धाम- केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री रेल्वे नेटवर्कने जोडले जातील. त्याच वेळी, ऋषिकेश आणि कर्णप्रयाग दरम्यान नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचा प्रकल्प देखील उत्तराखंडसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं बोललं जात आहे. हा रेल्वे मार्ग राज्यातील अनेक यात्रेकरूंसाठी उपयुक्त ठरेल, कारण यामुळे वेळ आणि प्रवास खर्च दोन्ही वाचेल आणि या क्षेत्रातील औद्योगिक विकासालाही चालना मिळेल.