

चोर काय चोरी करेल याचा नेम नाही आणि चोरीसाठी कुठल्या थराला जाईल याचाही अंदाज नाही. चंदीगडमध्ये अशाच एका चोराने प्रताप केला असून त्यामुळे पोलीसही हैराण झाले होते. कारण हा पठ्या 232 किमीचा प्रवास करून चोरीसाठी शहरात येत होता. विशेष म्हणजे हा पठ्या फक्त बुलेट चोरायचा हे विशेष.


हा चोर पंजाब येथील तरनतारन इथं राहणार आहे. बुलेट चोरी करण्यासाठी तो पंजाबहुन बसने चंदीगडमध्ये येत असत. चंदीगडमध्ये आल्यानंतर बुलेट चोरी करून तो बस स्टँडच्या पार्किंगमध्ये उभी करायचा. आता पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यामुळे त्याला गाडी पार्किंगची पावती मिळत होती.


त्यानंतर तो परत पार्किंगमध्ये जात होता आणि बुलेटचे लाॅक तोडून आरामात चालवत निघून जात होता. तसंच आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून पार्किंगची पावतीही मुद्दाम खराब करत होता.


पण चोर कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या तावडीतून काही सुटत नाही. अशाच एका दुचाकीची चोरी करताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं.