शहीद जनरल बिपीन रावत हे एका कार्यक्रमासाठी सैन्याच्या हेलिकॉप्टरने जात असताना खराब हवामानामुळं त्यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. त्यात त्यांचं निधन झालं आहे. शहीद जनरल रावत यांचं कुटुंब हे नेहमी देशसेवेत अग्रेसर राहिलेलं आहे. त्यांचे वडिल लक्ष्मण सिंह रावत हे भारतीय लष्करात सेवेत होते. ते लेफ्टनंट जनरल देखील राहिलेले आहेत.