तुकोगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी कमलेश शर्मा यांनी सांगितलं की, घरातून ऑफिसला जात असताना ओव्हरटेक करीत असताना तनिष्क सलूजा नावाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीच्या विद्यार्थिनीच्या वाहनापुढे जाणाऱ्या एका अज्ञात वाहन चालकाने इंडिकेटर न देता गाडी टर्न केली आणि मागून येणाऱ्या तनिष्का सलूजा नावाच्या तरुणीची गाडी स्लिप झाली. यामुळे तरुणी डिव्हायडरला आदळली. घटनास्थळी असलेल्या लोकांनी जवळील खासगी रुग्णालयात तिला दाखल केले, मात्र येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालविल्या प्रकारणी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.